Sant Shri
  Asharamji Ashram

     Official Website
 

Register

 

Login

Follow Us At      
40+ Years, Over 425 Ashrams, more than 1400 Samitis and 17000+ Balsanskars, 50+ Gurukuls. Millions of Sadhaks and Followers.
Recent Articles
5 Apr 15 I am now moving to bring out jail on bail Sri Asaram Bapu because the rape case is bogus. TDK responsible for arrest. - Subramanian Swamy
I am now moving to bring out jail on bail Sri Asaram Bapu because the rape case is bogus. TDK resp..... Read more..
4 Apr 15 दरकिनार हुआ समानता का सिद्धांत
क्या भारत में न्याय के लिए राजनेता या अभिनेता होना ही अनिवार्य हैं ? .. Read more..
4 Apr 15 यह कैसा है जादू समझ में ना आया
 यह कैसा है जादू समझ में ना आया .. Read more..
24 Mar 15 आज भी नहीं हो पायी संत आशारामजी बापू के भानजे की अंत्येष्टि
आज भी नहीं हो पायी संत आशारामजी बापू के भानजे की अंत्येष्टि शंकर भाई की अंतिम इच्छा के लिए हो रह..... Read more..
Marathi Dainik Sanatan Prabhat reports on attack on Ashram

Marathi Dainik Sanatan Prabhat reports..

दोन मुलांच्या कथित हत्येप्रकरणी पोलिसांनी प.पू. आसारामबापू यांच्या आश्रमातील साधकांना आणि सामान्य नागरिकांना दिलेली अमानवी वागणूक !

02-01-2010 : http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?id=27709

साधकांनो, भीषण काळात ईश्‍वरच आपला तारणहार आहे, हे लक्षात घेऊन कठोर साधना करा !

             मागील वर्षी प.पू. आसारामबापू यांच्या वतीने चालवण्यात येणार्‍या गुरुकुलामध्ये शिकणार्‍या दोन विद्यार्थ्यांचा नदीत बुडून अंत झाला. असे असतांनाही गुजरात पोलिसांनी आश्रमाच्या व्यवस्थापनावर ठपका ठेवत तेथील साधकांवर गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर पोलिसांनी विविध प्रसंगी आश्रमातील साधकांना अमानवी वागणूक दिली. कट्टर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाणारे श्री. नरेंद्र मोदी यांच्या राज्यात एका संतांना आणि त्यांच्या भक्‍तांना दिली गेलेली ही वागणूक निंदनीय आहे. गुजरात पोलिसांनी केलेल्या या निंदनीय कृतीविषयी `हिंदु व्हॉईस' या नियतकालिकाचे संपादक पी. दैवमुत्थू यांनी `ऋषीप्रसाद' या नियतकालिकामध्ये लेख लिहिला होता. तो येथे देत आहोत. भारतात सज्जनांचा कोणीही तारणहार नसून केवळ ईश्‍वरच आपले रक्षण करू शकतो, याची खूणगाठ आता हिंदूंनी मनाशी बांधून साधना वाढवावी, तसेच हिंदुसंघटनावर भर द्यावा, हेच यातून दिसून येते.

            


नदीत बुडून मृत्यू झालेल्या मुलांची हत्या केल्याच्या प्रकरणी गुजरात शासनाने प.पू. आसारामबापूंच्या आश्रमाचे संचालक आणि विश्‍वस्त यांवर कार्यवाही करणे
`जुलै २००८ या दिवशी आश्रमाच्या कर्णावती (अहमदाबाद) गुरुकुलातील दोन मुलांचा आकस्मिक मृत्यू झाला. पंचनामा अहवालाद्वारे (पोस्टमार्टम रिपोर्टद्वारे) हे स्पष्ट झाले आहे की, त्या मुलांचा मृत्यू नदीत बुडून झाला आहे. गुजरात शासनाद्वारे नियुक्‍त त्रिवेदी तपास आयोगानेही या घटनेला `हत्या' म्हटलेले नाही, तरीही गुजरात पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने (सी.आय.डी. क्राईम ब्रांचने) आश्रमाचे ७ संचालक आणि विश्‍वस्त यांवर कलम ११४ आणि ३०४ च्या अंतर्गत खटला दाखल केला.

उच्च न्यायालयाने (हायकोर्टाने) या बिनबुडाच्या खटल्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागाला दटावले असूनही वृत्तपत्राद्वारे कपोलकल्पित, अपमानयुक्‍त अश्लील लेख आणि बातम्या छापल्या जाणे
गुजरात उच्च न्यायालयाने (हायकोर्टाने) या बिनबुडाच्या खटल्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागाला चांगलेच दटावले. तसेच साधकांवर कोणतीही कार्यवाही करण्याची सध्या रोख लावली आहे. घटनाक्रमाची सत्यता अशी असतांनाही गुजरातच्या `संदेश' वृत्तपत्राद्वारे संत श्री आसारामजी बापूंच्या आणि आश्रमाच्या विरुद्ध द्वेष अन् ईष्येने प्रेरित होऊन बिनपुराव्याचे, खोटे, कपोलकल्पित, अपमानयुक्‍त अश्लील लेख आणि बातम्या छापल्या जात आहेत. यांमुळे करोडो लोकांच्या धार्मिक भावनेला ठेच पोहोचली आहे.

गुंडांनी विरोध फेरीत शिरून दगडफेक केल्यावर पोलिसांनी फेरीत सहभागी असणार्‍या महिला, साधक आणि सामान्य जनता यांच्यावर निर्दयतेने लाठीहल्ला करणे
२६.११.२००९ ला सहस्त्रावधी लोकांनी गांधीनगरमध्ये निषेध फेरी (रॅली) काढली. या फेरीत कुप्रचारकांच्या सुनियोजित षड्यंत्राच्या अंतर्गत `संदेश'च्या गुंडांनी साधकांप्रमाणे कपडे घालून गर्दीत शिरून दगडफेक केली. प्रत्युत्तर म्हणून क्रुद्ध पोलिसांनी साधक, भक्‍त आणि सामान्य जनता, ज्यांच्यात अनेक महिलासुद्धा होत्या, त्यांच्यावर निर्दयतेने लाठीमार केला.

अश्रुधूर आणि `हँडग्रेनेड' फेकून साधक-भक्‍तांना आतंकवाद्यांप्रमाणे वागणूक
देत पोलिसांनी फरफटत नेऊन तुरुंगात डांबणे

एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर अश्रुधुराचे ६० गोळे आणि ८ `हँडग्रेनेड' फेकले. जणू हे लोक सामान्य जनता नसून क्रूर, देशद्रोही, आतंकवादी असावेत. यात शेकडो लोक गंभीररीत्या जखमी झाले. बर्‍याच जणांचे हात-पाय मोडले. त्यांपैकी २३४ साधक-भक्‍तांना पोलिसांनी लाठीमार करीत फरफटत त्यांच्या गाड्यांमध्ये कोंबून ठाण्यात डांबले. पोलिसांच्या लाठीमारामुळे जखमी झालेल्या ज्या लोकांना रुग्णालयात समाविष्ट (दाखल) करण्यात आले होते, त्यांनासुद्धा मलमपट्टी झाल्यावर सरळ तेथून उचलून तुरुंगात डांबण्यात आले.

अत्यंत सुनियोजित पद्धतीने षड्यंत्र रचून पोलिसांनी काही जणांना खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवून, तर काही जणांवर हत्येशी संबंधित कलमे लावून तुरुंगात पाठवणे
`संदेश'च्या लोकांद्वारे संत आसारामजी बापू, तसेच त्यांच्या साधकांना कलंकित करण्यासाठी अत्यंत सुनियोजित पद्धतीने हे सर्व षड्यंत्र रचण्यात आले आणि `संदेश'च्या विरोधात होत असलेल्या जन आंदोलनाची दिशा पालटून (बदलून) पोलिसांना साधकांच्या विरोधात भडकविण्याचा प्रयत्‍न करण्यात आला. खरे पहाता साधक भक्‍तांनी ४ कि.मी. लांबीची यात्रा शांततेने पार पाडली होती; परंतु पोलिसांनी या गोष्टीकडे जराही लक्ष न देता ज्याप्रकारे निर्दयतेने लाठीमार केला, ते कृत्य अत्यंत लज्जास्पद आणि निंदनीय आहे. पोलिसांनी पकडलेल्या लोकांना दुसर्‍या दिवशी कलम १४३, १४७, १४८, १४९, ३३२, ३३३, ३३७, ३३८, १२० (बी),
१८६, बी.पी. दंडक (अँक्ट) कलम १३५, तसेच हत्येशी संबंधित कलम ३०७ अन्वये न्यायालयात उभे करून नंतर तुरुंगात पाठविले.

पोलिसांच्या गुंड प्रवृत्तीचे दर्शन घडवणारी काही उदाहरणे
अ. पोलिसांनी आश्रमात घुसून जो भेटेल, त्याला अत्यंत निर्दयतेने मारहाण करीत आपल्या वाहनांमध्ये कोंबणे : हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आस्था ठेवणार्‍या या साध्या-भोळया सामान्य लोकांना इतका कठोर दंड दिल्यावरही गुजरात पोलिसांचे समाधान झाले नाही. २७.११.२००९ या दिवशी पोलिसांच्या जवळजवळ २५ गाड्या, २०० पोलीस कर्मचारी, तसेच अनेक प्रसार-माध्यमांच्या कर्मचार्‍यांसह पोलिसांनी आश्रमावर अचानक धाड टाकली. आश्रमात जो कोणी जेथे ज्या स्थितीत दिसेल, त्याला लाथा-बुक्क्यांनी, जोड्यांनी, लाठ्यांनी आणि बंदुकीच्या दस्त्यांनी अत्यंत निर्दयतेने मारहाण करीत आपल्या वाहनांमध्ये कोंबले. बाहेरून आलेल्या आणि अनुष्ठान करीत असलेल्या कितीतरी वृद्ध साधकांना, माता-भगिनींना आणि काही निरागस मुलांनाही मारहाण करीत पोलिसांच्या वाहनांमध्ये कोंबण्यात आले.
आ. पोलिसांनी आश्रमातील सामानाची अत्यंत क्रूरतेने तोडफोड करणे : आश्रमाचे मुख्य श्रद्धाकेंद्र मोक्ष कुटीर, सिद्ध वटवृक्ष, मौन साधना गृह, साधक आणि संत निवासाच्या खोल्या, सत्साहित्य केंद्र, आरोग्य केंद्र (दवाखाना), दूरध्वनी कार्यालय, ऋषी प्रसाद कार्यालय इत्यादींची पोलिसांनी आपल्या लाठ्यांनी, बंदुकीच्या दस्त्यांनी अत्यंत क्रूरतेने तोडफोड केली आणि आतील सर्व सामानाची नासधूस केली. शोभेची कपाटे (शो-केस), तावदानांच्या (खिडक्यांच्या) काचा अकारण फोडल्या.
इ. मौन साधना करीत असलेल्या एका साधकाचे केस धरून फरफटत नेऊन त्याला अमानुषपणे मारणे : एवढेच नव्हे, तर मौन मंदिरात एक सप्‍ताह (आठवडा) मौन साधना करीत असलेल्या एका साधकाला पोलीस कर्मचार्‍यांनी द्वार तोडून, त्याचे केस धरून फरफटत नेऊन अमानुष लाठीमार केला. भक्‍तांना, तसेच भगवी वस्त्रे परिधान केलेल्या साधूंना पोलिसांनी शोधून शोधून मारले. साधना, भजन करीत असलेल्या साधकांना, साधूंना अधिक क्रूरतेने मारहाण केली. चार-चार, सहा-सहा पोलिसांनी एकेकाला मारले. हीच गुजरात पोलिसांची मानवता आहे का ? या संपूर्ण घटनाक्रमाचा साक्षीदार पोलिसांसोबत आलेला वीज अणु माध्यमाचा प्रमुख (इलेक्ट्रॉनिक मीडिया) आहे, ज्याने पोलिसांद्वारे करण्यात आलेल्या या निर्दयी कृत्याचे प्रसारण आपल्या वाहिनीवर (चॅनल्सवर) केले.
ई. पोलिसांनी विक्रीकेंद्रांवरील पैसे लुटणे : सत् साहित्य विभाग, ऋषी प्रसाद, लोक कल्याण सेतू, ध्वनी चकती (कॅसेट) विभाग इत्यादींच्या विक्रीकेंद्रांवर (काऊंटरवर) जे काही रुपये-पैसे होते, ते सुद्धा पोलिसांनी लुटले. साधकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी पोलिसांनी नदीच्या प्रांगणात गोळीबारही केला.
उ. २६ तासांपर्यंत कोणत्याही `एफ्.आय.आर्.' विना साधकांना बंदी बनवून मारहाण करणे : आश्रमातून घेऊन गेल्यावर बंदी साधकांना वाहनांतून उतरविल्यानंतर त्या ठिकाणापासून सुमारे ५० मीटर दूर असलेल्या मैदानावर बसविले जाणार होते. त्या संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कित्येक लाठीधारी पोलीस साधकांना अमानुषपणे लाठ्यांनी बडवत होते. सर्वाधिक लज्जास्पद बाब ही आहे की, गांधीनगर पोलीस २०० हूनही अधिक लोकांना २६ तासांपर्यंत कोणत्याही `एफ्.आय.आर्.' विना कोणत्याही कारणाशिवाय बंदी बनवून मारहाण करीत राहिले आणि भयंकर मानसिक क्लेश देत राहिले.
ऊ. पोलिसांनी मद्य पिऊन भक्‍तांना मारत त्यांना मांस खाणे आणि मद्य पिणे यांची सक्‍ती करणे अन् नकार देणार्‍यास आणखी मारणे, तसेच संत श्री आसारामजी बापूंच्या प्रतिमेची विटंबना करणे : रात्रभर गांधीनगरचे पोलीस मद्य पिऊन भक्‍तांना आणि आश्रमवासींना मारत राहिले. त्यांना मांस खाणे, मद्य पिणे यांसाठी विवश करण्याचा प्रयत्‍न करीत राहिले. संत श्री आसारामजी बापूंच्या प्रतिमेवर या साधक भक्‍तांना थुंकणे, जोडे मारणे, तसेच बापूजींना घाणेरड्या शिव्या देणे इत्यादींसाठी विवश करण्याचे प्रयत्‍न करण्यात आले. भक्‍त आणि साधक यांनी असे करण्यास नकार दिल्यावर त्यांना आणखी मारहाण करण्यात आली.

पोलिसांनी सोडल्यावर कित्येकांना रुग्णालयात भरती करावे लागणे
२७.११.२००९ ला सायंकाळी ४ वाजता ज्या २०० हूनही अधिक लोकांना बंदी बनविण्यात आले होते, त्यांपैकी १९० जणांना २८.११.२००९ या दिवशी, सायंकाळी ६ वाजता घायाळ अवस्थेत आश्रमात आणून सोडण्यात आले. त्यांपैकी कित्येकांच्या हाता-पायांना, डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांना शासकीय, तसेच वैयक्‍तिक (खाजगी) रुग्णालयात तात्काळ भरती करावे लागले.

कोणताही पुरावा किंवा साक्षीदार नसतांना कुख्यात व्यक्‍तीच्या सांगण्यावर `एफ्.आय.आर्.' नोंदवून प.पू. आसारामबापूंना दोषी ठरवणे; परंतु आश्रमात केलेल्या तोडफोडींविषयी वारंवार निवेदन देऊनही आतापर्यंत `एफ्.आय.आर्.' न नोंदवणे
पूज्य बापूजींच्या विरुद्ध चालू असलेले षड्यंत्र आता या पराकाष्ठेवर पोहोचले आहे की, अपराधी मनोवृत्तीच्या, चारित्र्यहीन राजू चांडक याच्या केवळ सांगण्यावरून कोणताही पुरावा किंवा साक्षीदार या विरहित त्याच्यावर करण्यात आलेल्या आक्रमणासाठी बापूजींना दोषी ठरवत, त्याच दिवशी `एफ्.आय.आर्.' नोंदविण्यात आला. याउलट पोलिसांनी २७.११.२००९ ला कर्णावती आश्रमाच्या साधकांना निर्दयतेने केलेली मारहाण आणि आश्रमात केलेली तोडफोड यांविषयी वारंवार निवेदन करूनही आतापर्यंत कोणताही `एफ्.आय.आर्.' नोंदविण्यात आला नाही.'

पोलिसांचे अमानवी कृत्य नरेंद्र मोदी यांच्यासारख्या हिंदुत्ववादी नेत्याच्या राज्यात घडावे, ही आश्चर्याची गोष्ट असून त्यामुळे त्यांनी स्वत:ला कट्टर हिंदु समर्थक मतदारांपासून दूर करणे
`बापूजींच्या साबरमती आश्रमात रहाणार्‍या साधकांना पोलीस असे मारत होते, जणू काही ते कुविख्यात अपराधी असावेत. साधूंना कट्टर गुन्हेगाराप्रमाणे मारहाण करणे, हे गुजरात पोलिसांचे कृत्य अत्यंत निंदनीय आहे. आश्चर्य या गोष्टीचे वाटते की, ज्यांचा आम्हाला गर्व होता, असे हिंदुत्वाचे पक्षधर श्री. नरेंद्र मोदी यांचे शासन असलेल्या राज्यात हे निंदनीय कृत्य झाले. काही काळापूर्वी त्यांच्या शासनाद्वारे कर्णावती आणि सूरत येथील बरीचशी मंदिरे भुईसपाट (जमीनदोस्त) करण्यात आली होती. असे हिंदूंविरोधी कृत्य करून श्री. मोदी काय प्रमाणित करू इच्छितात ? ते काँग्रेस, साम्यवादी, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्याप्रमाणे स्वत:ला निधर्मी सिद्ध करवू इच्छितात का ? जर मोदी असा विचार करत असतील, तर ते आपली कबर खोदून आपल्या कट्टर हिंदु समर्थक मतदारांपासून स्वत:ला दूर करीत आहेत.

पोलिसांनी असे धाडस मशीद किंवा चर्चमध्ये केल्याचे ऐकिवात नाही !
पोलिसांद्वारे एखाद्या मशिदीत शिरून एखाद्या अपराध्याला पकडून त्याला मारहाण करण्याची घटना मी ना कधी ऐकली ना कधी पाहिली आहे. एखाद्या मशिदीत किंवा चर्चमध्ये शिरून लाठीमार करण्याची वेळ तर दूरच, केरळच्या मराडमध्ये इ.स. २००३ मध्ये शुक्रवारचा नमाज पढून मशिदीतून परत येत असलेल्या मुसलमानांनी जेव्हा मासेमार्‍यांची निर्दयतेने हत्या केली, तेव्हासुद्धा पोलिसांनी त्या गुन्हेगारांशी अशा प्रकारचे वर्तन केले नव्हते. मी असेही ऐकले नाही की, गुजरात पोलिसांनी एखाद्या मशिदीत छापा मारून तेथील राष्ट्रद्रोह्यांना कधी पकडले असेल.
जर कोणी अवैध कृत्य केले, तर दंडक त्याच्यावर कार्यवाही करून त्याला दंड देऊ शकतो; परंतु एका आश्रमात शिरून साधकांना निर्दयपणे मारणे, हे आसुरी आणि अमानवीय कृत्य आहे. गुजरात पोलिसांमध्ये मशिदीत किंवा चर्चमध्ये शिरून अशा प्रकारे निर्दयपणे कोणाला मारण्याचे साहस आहे का ?

 


© दैनिक सनातन प्रभात

Source: http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2010-01-03&action=fullnews&catid=9&id=27709#

  Comments

New Comment
Created by DEEPAK BHANDARKAR in 3/6/2012 5:24:00 AMashram me ladkya samarpit karna chod do asaram maa bap ko bahot dukh hota hai ye bat acchi nahi hai malegaon me ek ladki ne tere ashram me samarpit hone ke liyae apne maa bap par police case kar de kay ye accha hai yaha tak ki police statuon me position pelane ka aarop lagaya katini sharmanak kahani hai ye tu to khud ko antaryami kehalata hai phir ja us ladki ko hakal ashram se jo apni maa baap ki na ho saki wo teri kaya hogi assaram is ka pap bhi tuje bhugatana padaga contact me &malegaon ashram very bad


Your Name
Email
Website
Title
Comment
CAPTCHA image
Enter the code
  
Copyright © Shri Yoga Vedanta Ashram. All rights reserved. The Official website of Param Pujya Bapuji